top of page

हुतात्मा चौकआत पत्रकारांवरील हल्ल्याप्रकरणी निदर्शने ; संरक्षण कायद्याची होळी

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नेमलेली फॅक्ट फायंडिंग कमिटी महाराष्ट्रात येऊन चौकशी करणार

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र विधानसभेत कायदा करण्यात आला असून हा कायदा अजामीनपात्र आहे.परंतु जेव्हा जेव्हा पत्रकारांवर हल्ला होतो तेव्हा पोलीस या कायद्याचा वापर करत नाहीत आणि आरोपीला मदत करण्यासाठी किरकोळ तरतूद करतात.जेव्हा पत्रकारांवर हल्ले होतात.त्यामुळे हा कायद्याचा वापर होत नाही, मग या कायद्याची गरजच काय?सरकारविरोधात संतप्त झालेल्या पत्रकारांनी आज हतात्मा चौकात निदर्शने करत पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केलेल्या कायद्याची प्रत जाळली.आमदारांचे गुंडांनी हल्ला करूनही त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई झाली नाही.पत्रकारांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज मुंबईतील १३ पत्रकार संघटना आणि राज्यातील विविध २५० पत्रकार संघटनांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर उत्स्फूर्त निदर्शने केली.  पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, पत्रकारांवरील हल्ल्यांचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.  आजच्या आंदोलनात मुंबई मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्ला वरोधी कृती समिती, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय व विधी मंडळ वारताहर संघ, मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघ, TVJA, BUJ, क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, पॉलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोसिएशनच्या पत्रकारांनी सहभाग घेतला. , बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन , महाड पत्रकार संघ, असोसिएशन ऑफ सबर्बन जर्नालिस्ट सर्व उपस्थित होते.त्याचा संताप व्यक्त करत मुंबईतील 11 पत्रकार संघटनांनी हतात्मा चौकात निदर्शने केली.  प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख व नरेंद्र वाबळे यांनी हतात्मा चौकात पुष्प अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.  यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिसांनी ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख, नरेंद्र वाबळे, किरण नाईक, शरद पुबळे, दीपक कैतके, राजा आदाटे, संदीप चव्हाण, मारुती मोरे, दीपक पवार, राजन पारकर, विनायक सानप,विशाल परदेशी, रईस अहमद व इतर पत्रकारांना ताब्यात घेऊन बळजबरीने पोलीस व्हॅनमध्ये बसवून आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणण्यात आले.एम.देशमुख म्हणाले की, गेल्या 4 वर्षात राज्यात 225 पत्रकारांवर हल्ले झाले, अणि फक्त ३७ केस मधी पत्रकार कायद्याचा वापर करण्यात आला आहे.पोलीस जाणीवपूर्वक पत्रकार कायद्याचा वापर करत नाही.पत्रकारांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा महाराष्ट्रातील पत्रकार शशिकांत वारसे आणि पत्रकार संदीप महाजन यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाची आणि गुंडांनी केलेल्या जीवघेण्या मारहाणीची गंभीर दखल घेतली आहे. या घटनांची चौकशी करण्यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नेमलेली फॅक्ट फायंडिंग कमिटी लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग यांनी सांगितले.


Comments


bottom of page