top of page

सहकार से समृद्धी,कार्यक्रमात एकनाथ शिंदेंची तोफ; उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

24 January 2025


मुंबई, गोरेगाव नेस्को मैदानात आयोजित करण्यात आलेल्या "सहकार से समृद्धी" या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर जोरदार शब्दात निशाणा साधला. अंधेरीतील सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेत, शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचे जोरदार समर्थन केले.


शिंदेंचा टोला:


“अमित भाई मुंबईत येणार म्हटले की काहींच्या पोटात मळमळ सुरू होते,” असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर उपहासात्मक टीका केली. “वाघनखे काढण्याची भाषा करणाऱ्यांकडे अमितभाईंच्या नखाची तरी सर आहे का? वाघनखे काढायची तर वाघाचे काळीज लागते आणि ते अमितभाईंकडे आहे. त्यांनी ते वेळोवेळी आपल्या कृतींमधून दाखवून दिले आहे,” असे ते म्हणाले.


महायुती सरकारच्या कामगिरीचे समर्थन:


शिंदेंनी गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. “महायुतीच्या कामांमुळे काही लोकांना जळफळाट होतो आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारची विधाने करत आहेत,” असे शिंदे म्हणाले.


कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांच्या या भाषणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच, या टीकेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहू लागतील, असे स्पष्ट झाले आहे.

Video

bottom of page