top of page

"सरकारला फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव वापरायचं, त्यांच्या विचारांचा सन्मान नाही - जयंत पाटील यांचा संताप"


मुंबई :- मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.


पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय होते. त्यामुळे या निर्माण कार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढंच काम निष्ठेने सुरू आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला.


सरकारच्या एकंदरीत कारभारावर टीका करताना ते म्हणाले की, राज्यभर सुरू असलेली रस्त्याची कामे देखील सुमार दर्जाची आहेत. महाराजांचा पुतळा बनवताना देखील असाच घोटाळा केला असणार. त्यामुळेच तेथील भौगोलिक परिस्थितीत पुतळा उभा राहू शकला नाही. ही सर्वस्वी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव वापरायचं. त्यांचे आचार, विचार, कृतीचा सन्मान होतोय का याबाबत सरकारला घेणेदेणे नाही असे म्हणत त्यांनी झालेल्या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला.

Comments


bottom of page