top of page

समान नागरी कायदा पारित करावा,अधिवेशनपूर्व सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेची मागणी



देशभरातील नागरिकांना एकत्र आणणारा समान नागरी कायदा पारित करण्यासाठी त्याचे विधेयक उद्यापासून (२० जुलै) सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणावे आणि कायदा पारित करावा, अशी मागणी, अधिवेशनपूर्व सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने केली. समान नागरी कायदा व्हावा, ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ईच्छा होती आणि त्यासाठीच शिवसेनेचा या कायद्याला पाठिंबा राहील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दिली. शेवाळे म्हणाले की, ३७० कलम रद्द व्हावे आणि भव्य राममंदिर निर्माण व्हावं या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ईच्छा, माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्तवाखाली केंद्र सरकारने पूर्ण केल्या आहेत. आता बाळासाहेबांची समान नागरी कायद्या विषयीची तिसरी ईच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे,म्हणूनच आम्ही समान नागरी कायद्याचे समर्थन करतो.

Comments


bottom of page