top of page

संजय दिना पाटील यांनी मुंबईत दाखल केली महाविकास आघाडीची उमेदवारी


आज ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विक्रोळीतील निवडणुक कार्यालयात हजारों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सहभागात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

संजय दिना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांनी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले की देशात लोकशाही धोक्यात आहे. महाविकास आघाडीसाठी राज्यात वातावरण चांगले असून महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा येतील अशी आम्हाला खात्री आहे. तर संजय दिना पाटील यांना दगडफेक झाल्यासंदर्भात विचारले असता, त्यांनी सांगितले की विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असून ते नौटंकी आणि रडीचा डाव खेळत आहेत. सत्ता त्यांची आहे तर त्यांनी चांगली सुरक्षा घेऊन प्रचाराला जावे. शिवसेना आमदार सुनिल राऊत म्हणाले की लोकांना आता परिवर्तन हवे आहे. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. मोदी आता पंतप्रधान होणार नाही हे आता त्यांना माहित झाले आहे. तर मुंबई कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सिंग सप्रा म्हणाले की आम्ही सर्व ठिकाणी महाविकास आघाडी सोबत असून पुर्ण ताकदीने त्यांना पाठिंबा देणार आहोत.

संजय दिना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी शिवसेना युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच

Comments


bottom of page