top of page

शिवसेनाची तिसरी यादी जाहीर, मुम्बादेवी मतदारसंघातून शायना एनसी यांना उमेदवारी

28 October 2024


मुंबई,हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, तसेच शिवसेना मुख्यनेते श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मुम्बादेवी मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर Mrs शायना चुडासामा मुन्होत, उर्फ शायना NC यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

शायना NC ह्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या महिला नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुम्बादेवी मतदारसंघात विकास साधण्यासाठी आणि जनतेच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. त्यांच्या उमेदवारीवर स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे.

शिवसेना पक्षाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शायना NC यांचे पुढील निवडणूक प्रचार सुरू होण्याची शक्यता आहे, ज्या अंतर्गत त्या त्यांच्या भागातील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या गरजांना अधोरेखित करतील.

bottom of page