शिर्डीत भाजपाचे महाअधिवेशन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले
top of page

शिर्डीत भाजपाचे महाअधिवेशन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

12 January 2025


शिर्डी: विधानसभेच्या निवडणुकीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाने शिर्डीत भव्य महाअधिवेशन आयोजित केले. या अधिवेशनाला राज्यातील भाजपाचे सर्व दिग्गज नेते, कार्यकर्ते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपाने या अधिवेशनात निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले.


अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान करत, "सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील निर्णय तीन-चार महिन्यांत झाल्यास निवडणुका होतील. या निवडणुकींसाठी भाजप सज्ज आहे, आणि विधानसभेसारखाच विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवायचा आहे," असे म्हटले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "विकासाची कामे करताना प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. हीच प्रतिमा कायम ठेवून आपण लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणार आहोत."


तसेच, त्यांनी भाजपाच्या यशावर प्रकाश टाकत म्हटले, "महाराष्ट्राने तीन वेळा भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा दिल्या आहेत. विधानसभेत ८२ टक्के गुण मिळवत महायुतीने विजय मिळवला, तर भाजपाने ८९ टक्के गुण मिळवत मेरिटमध्ये पास होण्याचा गौरव मिळवला आहे."


फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले, "साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या मंत्राचा विसर पडल्याने विरोधकांची स्थिती काय झाली, हे विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आले. भाजपासाठी राष्ट्र प्रथम असून, विकासाचा मंत्र कायमस्वरूपी आहे."


शिर्डीत पार पडलेले हे महाअधिवेशन भाजपासाठी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिशा ठरवणारे ठरणार आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या जोमदार सहभागामुळे पक्षाच्या आगामी निवडणूक मोहिमेला गती मिळणार असल्याचे स्पष्ट होते.

Video

MimTimes

7504696786

  • Whatsapp
  • Telegram
  • Linkedin
  • Instagram
  • Facebook
  • X
  • Youtube

© 2014 by TheHours. Powered and secured by Mimtimes

bottom of page