top of page

शिंदे सरकार डरपोक सरकार लोकसभा निवडूक ही घेणार नाही :आदित्य ठाकरे

आमदार आदित्य ठाकरे यानी मुबई विद्यापीठ सिनेट निवडुकीच्या स्थगिती वरन हल्लाबोल करत.मिघे सरकार डरपोक असल्याची टीका केलीय.काल रात्री अचानक ११ वाजता मुंबई विद्यापीठाचं पत्र निघालं, पुढील आदेशापर्यंत सिनेट निवडणुका स्थगित दिल्या. सरकार पलकुटे आहे…

आधी १० पैकी ८ मग १० पैकी १० सीट आम्ही जिंकलो, आमचा विजय चांगल्या मताधिक्यानं होत होता.रजिस्ट्रेशन सुरू झालं, निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही स्थगिती आली, असं घडलं तरी काय? काही गडबड झालीय का?

मणिपूरसारखं वातावरण वगैरे नाहीय, कुठेहा भांडणं मारामारी न होता ही निवडणूक होत होती, हे सगळे पदवीधर होते.अचानक काय घडलं? पत्रकात लिहिल्याप्रमाणे बैठक कुठे किती वाजता झाली हे कुणालाच माहीत नाही. पत्रातच त्याचा उल्लेख नाही.

कुलगुरू उप कुलगुरू फोन बंद करून बसलेत. निवडणूक होणार कधी? सव्वा लाख वोटर्सनं स्वतःच्या खिशातून पैसे दिलेत.

बोगस मतदार कमी करून सव्वा लाखावरीन ९५,००० वर आकडा आलाय.. मग आता ही भूमिका का?

घटनाबाह्य मुख्यमंत्री डरपोक आहेत, घाबरत होते म्हणून भाजपात उडी मारली, स्थानिक स्वराज्य निवडणुका होत नाही.. आता विद्यापीठाच्यापण निवडणुका थांबवल्या.कोण किती कोणासोबत हेही ज्यांना नाही माहीती, या दोन उपमुख्यमंत्र्यांचा काय उपयोग?

लोकसभा निवडणुकांचंही असंच होईल, पालिका प्रशासनच चालवतेय, पदवीधरांची सुशिक्षित मतदारांची चूक काय?

सिनेट तुमचं सरकार पाडणार नाहीय, तुमचं सरकार आम्ही पाडणार आहोत. सगळीकडे गेल्यावर्षी भाजपचा मिंधे गटाचा पराभव झालाय..

कोर्टात जाण्याआधी माहिती तर हवं कारण काय होतं ही निवडणूक रद्द करण्याचं? छाननी होऊनही निवडणूक घेत नाही म्हणजे तुम्हाला भीती वाटतेय

मी कुलगुरुंना भेटणार नाही पण आमचे नेते तिथे जातील आणि प्रश्न विचारतील

सरकार आपल्या दारी, निवडणूक घ्यायला घाबरी

निवडणुका घेतल्या असत्या तर पराभव झालाच असता त्यांचा

ते डरपोक नसते तर वॉशिग मशीनमध्ये ते गेले नसते.

२०२४ ला लोकसभा निवडणुकाही स्थगित होतील त्यांना फक्त नेमणुका करून जिंकायचंय.

देशात बहुमताचं सरकारही बनलंय, हा तर देशातला काय जगातला मोठा पक्ष आहे. फोडाफोडी करा, उधळपट्टी करा पण फायदा काय एक निवडणूक घेण्यासाठीही तुम्ही घाबरता तर तुमची काय दहशत आहे?

Comments


bottom of page