top of page

व्हीव्हीपॅट स्लीप्सची मोजणी: डॉ. किरन कुलकर्णी यांचा महत्त्वाचा बाईट


मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वास राखण्यासाठी राज्यभरातील 5 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट स्लीप्सची मोजणी लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. याबद्दल अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरन कुलकर्णी यांनी महत्त्वाची माहिती दिली.





"निवडलेली मतदान केंद्रे आणि त्यातील व्हीव्हीपॅट स्लीप्सची मोजणी पारदर्शक पद्धतीने केली जाईल. याचा उद्देश निवडणुकीतील विश्वासार्हता वाढवणे आहे," डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

"हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ज्यामुळे मतदान प्रक्रियेला अधिक स्पष्टता मिळेल. मतपत्रिकांवरील मते आणि व्हीव्हीपॅट स्लीप्स यामध्ये साम्य असावे, यासाठी मोजणी केली जाईल," असे ते पुढे म्हणाले.

यामुळे नागरिकांचे विश्वास वाढेल आणि निवडणूक प्रक्रियेस अधिक विश्वासार्हता मिळेल, असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोग यापुढेही पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अशा पद्धती वापरण्याचा विचार करत आहे.

bottom of page