top of page

विक्रोळीत दरड कोसळल्याने चार घरे बाधित, आधार भिंत कोसळल्याने नुकसान


विक्रोळीत दरड कोसळल्याने चार घरे बाधित, आधार भिंत कोसळल्याने नुकसान
विक्रोळीत दरड कोसळल्याने चार घरे बाधित, आधार भिंत कोसळल्याने नुकसान

मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) – विक्रोळी येथील पार्क साईट परिसरात दरड कोसळल्याने चार घरे बाधित झाली असून काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. दीड महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेली आधार भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी या घटनेची दखल घेतली असून तातडीने आधार भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वारंवार पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात, त्यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात येतात. याच कारणास्तव विक्रोळी येथे आधार भिंत बांधण्यात आली होती. मात्र, आज पहाटे लोकमान्य नगर, टाटा पावर हाऊस जवळील वर्षानगर या ठिकाणी दरड कोसळली. या दरडीचा मलबा आधार भिंतीवर पडल्याने ती कोसळली व परिणामी चार घरे व काही दुकाने मलब्याखाली दबली.

घटनेची माहिती मिळताच युवासेना कार्यकारीणी सदस्या राजोल संजय पाटील आणि शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका स्नेहल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत बाधितांना मदत पुरवली. या घटनेनंतर ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी तातडीने आधार भिंत बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील.

स्थानिक प्रशासन आणि महापालिका या घटनेची चौकशी करत असून बाधितांना त्वरित मदत पुरवली जात आहे.

Comments


bottom of page