29 October 2024
मुंबई,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) केंद्रीय संसदीय मंडळाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिली यादी प्रसिद्ध झाली होती, ज्यामध्ये ४५ उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले. त्यानंतर २६ ऑक्टोबरला २२ उमेदवारांची दुसरी यादी, २७ ऑक्टोबरला ९ उमेदवारांची तिसरी यादी, आणि २८ ऑक्टोबरला ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.