top of page

राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना जाहीर

मा. राष्‍ट्रपती अग्निशमन सेवा पदकप्राप्‍त जवानांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या अखत्‍यारीतील ‘अग्नि सेवा, नागरी सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालय’ यांच्याद्वारे स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला १४ ऑगसत जाहीर केली आहेत. त्‍यात मुंबई अग्निशमन दलातील प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र नारायणराव आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. दीपक कालीपद घोष, दुय्यम अधिकारी श्री. सुनील आनंदराव गायकवाड, प्रमुख अग्निशामक पराग शिवराम दळवी, अग्निशामक श्री. तातू पांडुरंग परब यांचा समावेश आहे.

१) प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र आंबुलगेकर

२) उपप्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. दीपक कालीपद घोष

३) शहर भागातील मेमनवाडा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले दुय्यम अधिकारी (सब ऑफिसर) श्री.सुनील गायकवाड

४) भायखळा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) श्री. पराग शिवराम दळवी

५) अग्निशामक (फायरमन) श्री. तातू पांडुरंग परब

Comentários


bottom of page