top of page

राज्यात 18 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद उन नबी ﷺ ची सुट्टी जाहीर करा,नसीम खान यांची मुख्यमंत्री कडे मागणी


राज्यात 18 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद उन नबी ﷺ ची सुट्टी जाहीर करानसीम खान यांची मुख्यमंत्री कडे मागणी
राज्यात 18 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद उन नबी ﷺ ची सुट्टी जाहीर करानसीम खान यांची मुख्यमंत्री कडे मागणी

मुंबईतील माजी मंत्री आणि प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्रात ईद-ए-मिलाद-उन-नबीﷺची सुट्टी 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबर रोजी घोषित करण्याची विनंती केली आहे.या पत्रात नसीम खान यांनी स्पष्ट केले की, 16 सप्टेंबर हा पैगंबर मोहम्मद ﷺ यांचा जन्मदिवस आहे, तर 17 सप्टेंबरला हिंदू बांधवांचा गणेश विसर्जनाचा (अनंत चतुर्थी) दिवस आहे, जो अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. सध्याच्या कॅलेंडरनुसार 16 सप्टेंबरला ईद-ए-मिलादसाठी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. मात्र, दोन्ही धर्मांच्या सणांचे पवित्रत्व आणि बंधुभाव कायम ठेवण्याच्या दृष्टीने, नसीम खान यांनी सुचवले की, ईद-ए-मिलादﷺची मिरवणूक 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबर रोजी काढली जावी.7 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या बैठकीत, मुंबईसह औरंगाबाद, जालना, मालेगाव, भिवंडी, ठाणे आणि इतर शहरांतील विविध मुस्लिम संघटनांनी एकत्रित चर्चा करून हा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार, गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादﷺहे दोन्ही सण शांतता आणि सौहार्दात साजरे व्हावेत, यासाठी मुस्लिम समुदायाने मिरवणुकीची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून, नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, राज्यातील सणांच्या पवित्रतेसाठी 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद ﷺ ची सुट्टी घोषित करावी.

Comments


bottom of page