top of page

राजापूर तालुक्यातील नारायण गणेश कुलकर्णी विद्धा निकेतन जनता कनिष्ठ महाविद्यालयात प्रशिक्षण केंद्र

कौशल्य विकास योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा शासनाच्या धोरणानुसार निवड

राजापूर तालुक्यातील सागवे येथील नारायण गणेश कुलकर्णी विद्धा निकेतन जनता कनिष्ठ महाविद्यालयाची कौशल्य विकास योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा शासनाच्या धोरणानुसार निवड झाली आहे.१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना या अभ्यासक्रमात भाग घेता येणार आहे. सागवे येथे कौशल्य विकास योजनेंतर्गत अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी सागवे- गोठिवरे ग्रामविकास मंडळाचे सरचिटणीस संदेश खडपे यांनी खूप मेहनत घेतली. दिल्ली येथून सागवे येथील कनिष्ठ महाविद्यालयाची कौशल्य विकास योजनेंतर्गत अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी निवड झाली आहे. शासनाशी संबंधित असलेल्या प्रगती स्कील डेव्हलमेंट सेंटर यांच्या वतीने कौशल्य विकास योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सोईसुविधांनी युक्त असे अग्रगण्य नारायण गणेश कुलकर्णी विद्धा निकेतन जनता कनिष्ठ महाविद्यालय बनवण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. प्रगती स्कील डेव्हलमेंट सेंटर समन्वयक सागर निंबाळकर यांनी दोन दिवसापूर्वी सागवे येथील कनिष्ठ महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयाची पाहणी केली. शासनाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम १८ ते ४५ वयोगटातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोफत शिक्षण दिले जाईल. यामध्ये शिवणयंञ प्रशिक्षण,ब्युटीशियन प्रशिक्षण,संगणक प्रशिक्षण इत्यादींचा समावेश आहे. तसेच, स्थानिक व्यक्तीला कौशल्य विकास योजनेचे समन्वय म्हणून निवड केली जाईल आणि प्रशिक्षण देणार्या प्रशिक्षकांचे वेतन प्रगती स्कील डेव्हलमेंट सेंटर कडून दिले जाईल. कंपनी करार तीन वर्षाचा असून पुढे भविष्यात करारात वाढ केली जाईल. शाळेला काय मिळणार ? शासकीय कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण केंद्र सुरु केल्याबद्दल प्रती वर्षी एक लाख रूपये अनुदान किंवा त्या किंमती इतके शाळेला आवश्यक असणारे विविध साहित्य कंपनी मार्फत दिले जाईल. सागर निंबाळकर यांच्या महाविद्यालयीन भेटी दरम्यान संस्थेचे स्थानिक उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.के.जी.गवळी , मुख्याध्यापक बी.जी.कांबळे उपस्थित होते अशी माहिती सरचिटणीस संदेश खडपे यांनी दिली.


Comments


bottom of page