राज ठाकरेंची दुकानदारी लवकरच बंद होईल रामदास आठवलेंचा संघर्ष कायम सुरू राहील
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Nov 2, 2024
- 4 min read

2 November 2024
मनसेचे नेते राज ठाकरे यांची नुकतीच एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मुलाखत घेण्यात आली.त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी रामदास आठवले यांच्यासारखे मंत्रिपद मला मिळाले तर मी माझा पक्ष बंद करेल असे अवमानकारक विधान केले होते. राज ठाकरेंचे हे विधान म्हणजे रामदास आठवले यांचा आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचा आवमान आहे. राज ठाकरे यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे.जातीभेदाचा दर्प असणारे विधान आहे .त्यांच्या या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे ज्या मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत ते भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्रालय आहे. या सामाजिक न्याय मंत्रालयात अनुसूचित जाती; इतर मागासवर्गीय ; दिव्यांग ; ज्येष्ठ नागरिक आणि ट्रान्सजेंडर तसेच व्यसनमुक्तीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाकडून काम केले जाते .समाजातील या दुर्बल वंचित घटकांना न्याय देणाऱ्या मंत्रालयाबद्दल राज ठाकरे यांचे विचार अत्यंत सरंजामशाहीचे आणि जातीभेदाचा दर्प असणारे आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाला "असले" मंत्रालय असा अवमानकारक उल्लेख केल्याबद्दल आम्ही राज ठाकरेंचा तीव्र निषेध करतो.
सामाजिक न्याय मंत्रालय हे या देशाचे महत्त्वपूर्ण मंत्रालय आहे l.या मंत्रालयातून अनुसूचित जाती; इतर मागासवर्गीय समाज; दिव्यांग ; जेष्ठ नागरिक; ट्रान्सजेंडर आणि व्यसनाधीनते पासून मुक्ततेसाठी हे मंत्रालय काम करते. देशातील 75 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या या मंत्रालयाच्या अंतर्गत येते.इतके हे महत्त्वपूर्ण मंत्रालय असून या मंत्रालयात केवळ अनुसूचित जातीच्या अर्थात दलितांच्या कल्याणाचे मंत्रालय असल्याने या मंत्रालयाबाबत राज ठाकरे 'असले 'मंत्रालय म्हणून हिणवण्याचा आणि अवमान करण्याचा राज ठाकरे यांनी प्रयत्न केला आहे .
राज ठाकरे यांची वाटचाल हीच मुळात परिवर्तन धर्मनिरपेक्षता; सामाजिक समता नाकारणारी आणि विषमतेला आणि सनातनी विचाराला कवटाळणारी भूमिका राहिली आहे.राज ठाकरे सारखी व्यक्ती हे कबूल करणार नाहीत मात्र मनातून आकंठ जातीभेदात बुडालेले व्यक्ती ते आहेत. अधून मधून केलेल्या वक्तव्यातून त्यांच्यातील जातीभेदाचे विष बाहेर पडते.
अनेकदा त्यांनी दलित आदिवासी ओबीसींच्या सामाजिक आरक्षणाला विरोध केला आहे. आरक्षणाला विरोध हा जातिभेदाला खतपाणी घालणारा; जातीय विष समाजात पेरणारा आहे.
भारत देश लोकशाही प्रधान देश आहे. महामानव
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर भारत देशाची लोकशाही मजबूत उभी आहे.
राष्ट्रीय एकात्मता समता बंधुता सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता या तत्त्वामुळे हा देश मजबूत आहे.भारतीय संविधानाने विविधतेने नटलेल्या भारत देशाला अखंड एकजूट ठेवलेले आहे.राज ठाकरे सारखे प्रांतवादी नेते मात्र संविधानाच्या या राष्ट्रीय एकात्मतेच्या भूमिकेवर घाला घालण्याचे काम करतात. प्रांतवाद हा या संविधानिक युगात किती योग्य आहे. मराठी गुजराती कानडी उत्तर भारतीय भय्या भागाव असे प्रांतवाद करून केवळ आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेवर हल्ला करणाऱ्या प्रांतवादाला वाढवण्याचे काम राज ठाकरे सरखे नेते करतात.
या देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे समतेचे युग सुरू होत आहे. राष्ट्रीय एकात्मता; सर्वधर्मसमभाव; पूरोगामी विचार; सामाजिक परिवर्तनाचा विचाराला बळ मिळत जाणार असून या पुढे आम्ही सर्व भारतीय म्हणून देशात सामाजिक एकोपा निर्माण करून राष्ट्रीय ऐक्याचं वादळ या देशात उभे राहील तेव्हा राज ठाकरे सारख्यांची प्रांतवादाची दुकानदारी पालापाचोळ्या सारखी उडून जाईल.
एकविसावे शतक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे संविधानाचे समतेचे भीम युग आहे.
येणाऱ्या काळात या देशात समतेचे वादळ उभे राहील. विषमतेचा पालापाचोळा उडून जाइल .त्यात राज ठाकरेंचं दुकान जरूर बंद होईल.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे संघर्षातून उदयास आलेले नेते आहेत.त्यांनी गावागावात ; गल्लीगल्लीत काम करून आज ते दिल्लीत पोहोचले आहेत.राज ठाकरे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले राजपुत्र आहेत .त्यांना गल्लीबोळातील गरिबांचे दुःख माहीत नाही. त्यांना संघर्ष माहित नाही .त्यांना राजकारणाची दुकानदारी माहित आहे.अनेकदा राज ठाकरेंनी राजकीय भूमिका बदललेली आहे. कधी मराठी भाषेचा प्रांतवाद तर कधी हिंदुत्ववाद या दोन्हीही वादाचा अतिरेक आणि त्यावर आधारित भेदभाव संविधानाला मान्य नाही.
हा भेदभाव भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेवर घाव घालणारा आहे.
राज ठाकरेंची सामाजिक भूमिका ही कधीही समतेची; सामजिक परिवर्तनाची आणि सामाजिक सुधारणेची राहिलेले नाही.ते स्वतः एक व्यंगचित्रकार आहेत .त्यांना मात्र कधीही हिंदू धर्मातील जुन्या चालीरीतीमधील
व्यंग आणि चुकीच्या गोष्टी दिसल्या नाहीत. त्यांच्या व्यंगचित्रात कधीही सामाजिक व्यंगावर प्रहार दिसला नाही. दलित आदिवासींवरील अन्याय आणि त्यांचे प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रातून कधी मांडले नाहीत.
दलित अत्याचाराच्या प्रश्नांवर ते घुमे मूकबधिर होऊन बसतात.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ;महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज या महामानवांचा राज ठाकरे यांना फारसा अभ्यास नाही. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा राज ठाकरेंना गंध नाही.
आगामी काळात या देशात समतेचे युग आणि समतेचे वादळ सुरू होणार आहे.त्यात राज ठाकरेंचे प्रांतवादी दुकान वाहून जाणार आहे.
रामदास आठवले सारख्या संघर्ष नायकावर टीका करणे योग्य नाही.
रामदास आठवले हे प्रचंड कष्टाने घडलेले नेते आहेत. प्रचंड संघर्ष करून उभे राहिलेले संघर्ष नायक आहेत. राजकारणात त्यांचा विरोधी पक्षाशी संघर्ष असतोच पण त्याचवेळी मित्र पक्षाशी त्यांना संघर्ष करावा लागतो. राजकारणातील अत्यंत मुत्सद्दी नेतृत्व रामदास आठवले आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिका कालांतराने अनेकांनी रामदास आठवलेंच्या भूमिकांचं अनुकरण केलेला आहे.
आज राज ठाकरे सुद्धा भाजपशी
युती करू पाहत आहेत.रामदास आठवलेंच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न राज ठाकरे करीत आहेत.राजकारणात रामदास आठवले बाप माणूस आहे. त्यांना कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा त्याची चांगली समज आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेले निर्णय स्वतःच बदललेले आहेत . त्यांच्या कोणत्याही भूमिकेवर ते कधी ठाम राहिलेले नाहीत. राज ठाकरेंनी राजकीय भूमिका कशा घ्याव्यात याचे शिक्षण रामदास आठवले यांच्या कडून घेतले पाहिजे .रामदास आठवले यांनी त्यांच्या आयुष्यात केलेला संघर्ष राज ठाकरे कधी करू शकत नाहीत .
रामदास आठवले यांचा संघर्ष थांबलेला नाही आणि थांबणार ही नाही. आजही रामदास आठवले संघर्षासाठी सदैव सज्ज असणारे नेते आहेत . म्हणूनच दलित बहुजनांची ते संघर्षनायक आहेत. रामदास आठवलेंचा संघर्ष कायम सुरू राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीत त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या पदरात महायुतीने एकही जागा दिली नसली तरी महायुतीच्या विजयात रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचा महत्त्वाचा वाटा असेल. महायुतीची सत्ता आल्यानंतर सत्तेचा योग्य वाटा रिपब्लिकन पक्षाला मिळणार आहे .राजकीय व्यवहारज्ञान रामदास आठवलेंकडून शिकले तर राज ठाकरेंना त्यांची दुकानदारी बंद करण्याची वेळ येणार नाही. रामदास आठवले संयमी दूरदृष्टी असणारे नेते आहेत .राज ठाकरे हे त्यांच्यासमोर ज्युनिअर आहेत.
राज ठाकरे हे त्यांच्या आयुष्यात एकाही सभागृहाचे सदस्य कधी झाले नाहीत .लोकप्रतिनिधी म्हणून ते कधी निवडून आलेले नाहीत.लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी राजकारणात काम केलेले नाही. याउलट रामदास आठवले हे राज्यात कॅबिनेट मंत्री राहिलेत .लोकसभेत तीन वेळा खासदार राहिलेत. राज्यसभेत दोन वेळा खासदार राहिलेत. या देशात भारत सरकारमध्ये तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून ते काम करीत आहेत. प्रचंड अनुभव असणारे ते ज्येष्ठ नेते आहेत. राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिपदाचा अनुभव नसल्यामुळे भारत देशाच्या मंत्रीपदाचे महत्व राज ठाकरेंना काय कळणार ? महाराष्ट्राच्या बाहेर ते फारसे जात नाहीत. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील मंत्रिपदाचे महत्त्व राज ठाकरेंना काय कळणार?
संघराज्य असणाऱ्या भारताला अखंड आणि मजबूत ठेवण्यासाठी मी प्रथम भारतीय नंतर भारतीय आणि अंतिमतःही भारतीय आहे ही महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण महत्त्वाची आहे.
राज ठाकरे हे स्वतःला प्रथम मराठी आणि नंतर भारतीय समजतात असा त्यांचा व्यवहार आजपर्यंत चा आहे.
राज ठाकरेंना भारतीयत्व राष्ट्रीयत्व चे महत्व समजत नसल्याने संविधानप्रेमी जनता लवकरच राज ठाकरेंची राजकीय दुकानदारी नक्की बंद करेल.
संविधानाच्या रक्षणासाठी संघर्षनायक रामदास आठवलेंचा संघर्ष मात्र अविरत सुरू राहील.
लेखक — हेमंत रणपिसे