top of page

रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मिळणार सरकारची प्रेमाची ओवाळणी


मुंबई, ८ ऑगस्ट २०२४: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या अगोदरच महाराष्ट्रातील १ कोटी २७ लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राबवण्यात येणारी ही योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठी भेट ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर थेट निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली.

डॉ. वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले की, "मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी सोनिया गांधी यांच्या दारात उभे राहणे ही खरी भीक आहे." रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महिलांना हक्काचे माहेर मिळाले आहे, आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांना दरमहा मानाचा आहेर मिळणार आहे, असेही वाघमारे म्हणाल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला महिला वर्गाकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता विरोधकांची चिंता वाढली आहे. विरोधकांनी योजनेवर टीका करत कोर्टात जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने योजनेला मंजुरी दिली आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.

Commentaires


bottom of page