top of page

मेरी माटी,मेरा देश’अर्थात माझी माती माझा देश: एकनाथ शिंदे महानगरपालिकेच्या कामांवर कौतुकाचा वर्षाव

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या बलिदानामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘स्वदेश’, ‘स्वधर्म’ आणि ‘स्वाभिमान’ जागृत झाला आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, ‘माझा देश’, या अभियानातून आपल्याला ‘स्वदेश’, ‘स्वधर्म’ आणि ‘स्वाभिमान’ हाच मंत्र मिळाला आहे. या मंत्राचा जागर करणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे, असा संदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिला.उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, विविध मान्यवर उपस्थित होते.

विकसित भारताची संकल्पना नव्या पिढीमध्ये रुजविणे गरजेचे - श्री. देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांना देशातील गुलामगिरीच्या खुणा संपवायच्या आहेत. आपली संस्कृती आणि परंपरा जपताना बुरसटलेल्या आणि कालबाह्य संकल्पना खोडून काढत आदर्श आणि विकसित भारताची संकल्पना नव्या पिढीमध्ये रूजवायची आहे. त्यासाठीच पंच प्रण (शपथ) नागरिकांनी घेणे अपेक्षित आहे. पंच प्रण यातील नागरिकांचे कर्तव्य हादेखील महत्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागरिकांच्या कर्तव्यामुळेच देशाच्या प्रगतीचा दर वाढू शकतो. ‘माझी माती, माझा देश’ यासारख्या उपक्रमातून शहिदांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे वन विकसित करण्यात येणार आहे. अशा उपक्रमातून भारताची ताकद दाखवणे हा उद्देश आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई बदलत आहे. मुंबईतील सुशोभीकरण आणि सिमेंट काँक्रिटचे रस्ते हे त्याचे ठळक उदाहरण आहे. अशा शब्दातही त्यांनी महानगरपालिकेच्या कामांचे कौतुक केले.

मुंबईकरांच्या स्पिरीटचे कौतुक: अजित पवार

अभियानाच्या निमित्ताने देशभक्तीची ज्योत कायम प्रज्ज्वलित राहील, तसेच वीरांच्या बलिदानाचा इतिहास हा पुढील पिढीपर्यंत पोहचेल, यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. नव्या पिढीला शहिदांचे योगदान, ज्यांनी देशाचा गौरव वाढवला, अशा मागील पिढीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. वीरांप्रति ऋण व्यक्त करतानाच विकासाची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. त्याच दृष्टीने नव्या पिढीने वाटचाल करणेही गरजेचे आहे. त्यासोबतच जातीय आणि धार्मिक वाद टाळून देशाची एकजूट कायम राहील, यादृष्टीने प्रयत्न हाणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन अशा अनेक आंदोलनात मुंबईकर नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. मुंबईवर येणारी अनेक नैसर्गिक संकटे व आपत्ती यांच्या आव्हानांवर मात करत मुंबईकरांनी ‘मुंबई स्पिरीट’ कायम ठेवले आहे,

Comments


bottom of page