top of page

"मुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयातील १८ मृत्यूंची चौकशी केली, प्रक्रियात्मक सुधारणांचे आदेश दिले"


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णालयात झालेल्या 18 मृत्यू नक्की का झाले आणि कोणत्या परिस्थितीत झाले याची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिदल, अति. आयुक्त संदीप माळवी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.माळेगावकर, इत्यादी अधिकारी उपस्थित आहेत.

Comments


bottom of page