top of page

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला सॅटीस प्रकल्पाला गती देण्याचे आदेश दिले


मुंबई, ६ ऑगस्ट - कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सॅटीस (स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम) प्रकल्प महत्वाचा ठरेल, असे सांगत मुंबई महापालिकेला या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कुर्ला विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.


या बैठकीला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय.एस. चहल, विकास खारगे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.


मुख्यमंत्री शिंदे यांनी कुर्ला मतदारसंघातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी उपलब्ध जागेत बॉटनिकल गार्डन साकारण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच, चुनाभट्टी येथील रेल्वे फाटकाच्या जागी उड्डाणपुल निर्माण करण्याच्या कामाला रेल्वेच्या सहकार्याने गती देण्याचे निर्देश दिले.


कुर्ला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.

Comments


bottom of page