11, December 2024
मुंबई: मुंबई महानगरपालिका के.ई.एम. रुग्णालयामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जुन्या इमारतींच्या अपुरेपणामुळे २०० नवीन बेड आणि २२ ऑपरेशन थिएटरसह ३२ मजली नवीन इमारत बांधण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने मंजुरीची मागणी करण्यात आली आहे.
भाजप प्रवक्ता आणि स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्राद्वारे या विषयाचा पाठपुरावा केला आहे. सद्यस्थितीत के.ई.एम. रुग्णालयातील जुन्या चार इमारतींचा उपयोग होण्यास मर्यादा आहेत, आणि त्यामुळे रूग्णांसाठी अद्ययावत सुविधा पुरविणे कठीण झाले आहे.
या प्रस्तावित नवीन इमारतीसाठी अंदाजे ५००० चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, रुग्णालय व्यवस्थापनासाठी २५ लाख लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी ही इमारत महत्त्वाची आहे.
महानगरपालिकेने या प्रस्तावावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.
(संपादक - मिम टाइम्स)