top of page

मुंबई पालिकेला पार्किग कंत्राटात 200 कोटींहून अधिकचे नुकसान

मुंबई,मुंबई महापालिकेच्या एलेव्हेटेड मल्टीलेव्हल इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंग सिस्टीमवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या प्रकल्पात सुमारे 200 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप केला आहे आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गलगली यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवले आहे.

प्रकल्पात मेसर्स सोटेफिन पार्किंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मुख्य उपकरणे उत्पादन भागीदार आहे. त्यांनी नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा आणि GPRA येथे कमी दरात पार्किंग सिस्टीम बसवली आहे, परंतु मुंबईत अधिक खर्च आकारला जात आहे. दिल्लीतील एका कारसाठी 7 ते 17 लाख खर्च येतो, तर मुंबईत तो 22 ते 40 लाखांपर्यंत आहे. या संदर्भात गलगली यांनी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

गलगलींच्या म्हणण्यानुसार, इतर सरकारी विभागांनी दिलेल्या कंत्राटाच्या तुलनेत मुंबई महापालिकेने जवळपास 200% ते 300% अधिक किंमतीत कंत्राट दिले आहेत. यामुळे या प्रकल्पाची चौकशी होण्याची मागणी वाढत आहे.

Comments


bottom of page