
25 February 2025
मुंबई ,समान काम, समान दाम या मागणीसाठी बेस्ट उपक्रमातील खासगी कंत्राटदारांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. याचा थेट परिणाम बेस्टच्या बस फेऱ्यांवर झाला असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाने आपल्या चालक आणि वाहकांच्या मदतीने बस सेवा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
मातेश्वरी कंपनीच्या 590 शेड्युल्ड बसपैकी फक्त 308 बस रस्त्यावर धावल्या असून 282 बस "नॉट आऊट" राहिल्या आहेत. हे प्रमाण जवळपास 52.20% इतके आहे, जे सर्वात कमी टर्नआउटपैकी एक आहे.
• मरुती: 625 पैकी 506 बस रस्त्यावर (80.96% टर्नआउट)
• टाटा: 340 पैकी 181 बस रस्त्यावर (53.24% टर्नआउट)
• इ-ट्रान्स: 324 पैकी 309 बस रस्त्यावर (95.37% टर्नआउट)
• ओलेक्ट्रा: सर्व 40 बस रस्त्यावर (100% टर्नआउट)
• स्विच: 50 पैकी 47 बस रस्त्यावर (94% टर्नआउट)
1969 शेड्युल्ड बसपैकी फक्त 1391 बस रस्त्यावर धावल्या असून 578 बस नॉट आऊट राहिल्या आहेत. त्यामुळे एकूण टर्नआउट 70.64% वर घसरले आहे.
मातेश्वरी कंपनीच्या वडाळा डेपोमध्ये बस चालक-वाहकांनी संपादरम्यान काही बसचे नुकसान केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे बेस्ट उपक्रमाला अतिरिक्त आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
कंत्राटाच्या अटींनुसार कोणतीही बस रस्त्यावर न आणल्यास कंत्राटदार कंपनीकडून प्रति बस प्रतिदिन ₹5,000/- दंड आकारला जातो. महिन्याच्या अखेरीस हा दंडात्मक हिशेब करून कंत्राटदाराच्या बिलातून कपात केली जाते.
बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या गैरसोयी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले असून संप लवकरच मिटावा यासाठी चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत.