top of page

महारेराने 13 हजार 785 स्थावर संपदा एजन्टसची नावे मान्यताप्राप्त यादीतून वगळली, पुन्हा काम करायचे असल्यास विहित प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक

मुंबई,11 मार्च ,स्थावर संपदा एजंटसनी 2017 साली मिळालेल्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही  म्हणून  महारेराने 13 हजार 785 एजंटसची नोंदणी रद्द केली आहे. या सर्व एजंटसची संकलित यादी महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या एजंटसना पुन्हा एजंटस म्हणून काम करायचे असल्यास विहित प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही.यात मुंबई आणि मुंबई उपनगराचे 6291 असे  सर्वात जास्त एजंटस असून त्यानंतर ठाणे 3075 आणि पुणे 2349 येथील एजंटसचा क्रमांक लागतो.एकीकडे नुतनीकरणा अभावी अशी संख्या कमी होत असताना नवीन एजंटसही पात्र ठरले आहेत. एजंटससाठी विहित केलेली चौथी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल  जाहीर करण्यात आला आहे. यात 1767 उमेदवार परीक्षेला बसले होते . त्यापैकी 1527 उमेदवार पात्र ठरले आहेत. 240 उमेदवार नापास झाले. या परीक्षेचा निकाल 86.41% टक्के लागला असून मुंबईतील श्रीमती आरोही चिराग भिमाजियानी ह्या 100% गुण मिळवून सर्वोत्तम ठरल्या आहेत.आतापर्यंत झालेल्या 4 परीक्षांमध्ये 100 टक्के गुण मिळविणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत.

댓글


bottom of page