top of page

महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत प्रथम स्थान कायम ठेवले


**महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत प्रचंड यश: 2024 च्या पहिल्या तिमाहीत 52.46% गुंतवणूक एकट्या राज्यात!**
**महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत प्रचंड यश: 2024 च्या पहिल्या तिमाहीत 52.46% गुंतवणूक एकट्या राज्यात!**

मुंबई, ६ सप्टेंबर २०२४: देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्रात एकूण ३,६२,१६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती. त्यानंतर, अडीच वर्षांत ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे. त्यांनी असेही सांगितले की, दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून उपलब्ध असली तरी एकूण गुंतवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षांत उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर राहिले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत राज्यात सर्वाधिक गुंतवणूक प्राप्त झाली आहे. एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत, देशात आलेल्या १,३४,९५९ कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीपैकी ७०,७९५ कोटी रुपये म्हणजेच ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

राज्यांच्या गुंतवणुकीच्या आकडेवारीनुसार, पहिल्या स्थानावर महाराष्ट्र आहे (७०,७९५ कोटी रुपये), दुसऱ्या स्थानावर कर्नाटक (१९,०५९ कोटी रुपये), तिसऱ्या स्थानावर दिल्ली (१०,७८८ कोटी रुपये), चौथ्या स्थानावर तेलंगणा (९,०२३ कोटी रुपये), आणि पाचव्या स्थानावर गुजरात (८,५०८ कोटी रुपये) आहे.

अतिरिक्त गुंतवणुकीच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये राज्यात १,१८,४२२ कोटी रुपये गुंतवणूक आली होती जी कर्नाटक, दिल्ली, आणि गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती. २०२३-२४ मध्ये १,२५,१०१ कोटी रुपये गुंतवणूक राज्यात आली होती, जी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात व कर्नाटक यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती.

Comments


bottom of page