top of page

महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरणाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा


पालघर, दि. 30 (जिमाका) - महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण व उच्च पदांवरील महिला अधिकारी यांच्या कामगिरीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. पालघर येथे आयोजित वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात श्री. मोदी यांनी राज्यातील महिला सशक्तीकरणावर प्रकाश टाकला आणि महिला अधिकाऱ्यांचे विशेष उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, "महाराष्ट्रातील महिला अधिकारी अनेक उच्च पदांवर सक्षमपणे काम करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक कार्यरत आहेत. पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला, वन संरक्षण बलाच्या प्रमुखपदी सौमिता बिश्वास, विधी विभागाच्या प्रमुख म्हणून सुवर्णा केवले, प्रधान अकाऊंटंट जनरल पदी जया भगत आणि मुंबईतील कस्टम विभागाची धुरा प्राची स्वरूप सांभाळत आहेत. मेट्रो तीनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून अश्विनी भिडे काम करत आहेत."

श्री. मोदी यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचेही उल्लेख केले. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटर आणि पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचा गौरव केला.

"महाराष्ट्रातील नारीशक्ती उत्कृष्ट कार्य करत आहे आणि विसाव्या शतकातील नारीशक्ती समाजाला नवी दिशा देण्यासाठी तयार आहे. ही नारीशक्तीच विकसित भारताचा मोठा आधार आहे," असे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केले.

Comments


bottom of page