top of page

महाराष्ट्रातील 59 पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शौर्य व सेवा पदके

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024: 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस सेवेत उल्लेखनीय कार्य केलेल्या 1037 कर्मचाऱ्यांना विविध शौर्य व सेवा पदके प्रदान केली. यामध्ये महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिकाऱ्यांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' सन्मानित करण्यात आले. अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, संचालक राजेंद्र बालाजीराव डहाळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश राघवीर गोवेकर यांना या पदकाने गौरविण्यात आले.


राज्यातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना 'पोलीस शौर्य पदक' प्रदान करण्यात आले, तर 39 पोलिस कर्मचाऱ्यांना 'पोलीस पदक' दिले गेले. 'पोलीस शौर्य पदक' गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी दिले जाते, तर 'पोलीस पदक' गुणवत्तापूर्ण सेवा व कर्तव्यनिष्ठेसाठी दिले जाते.


संपूर्ण देशभर 908 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 'पोलीस पदके' प्रदान करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 59 पोलिसांचा समावेश आहे. सविस्तर यादी www.mha.gov.in आणि https://awards.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

コメント


bottom of page