top of page

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ जुलै पर्यंत सुरू राहणार

आज मुंबई येथील विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, मुंबई येथील आझाद मैदानात गिरणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत केली.

सदरहू बैठकीत समितीने विचार विनिमय करून सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे असा निर्णय घेतलेला आहे.

विधानपरिषद सल्लागार समिती बैठकीत खालील मुद्दयावर चर्चा व निर्णय झाला.

(१) शुक्रवार, दिनांक २८ जुलै, २०२३ रोजी शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज (विधेयके) होतील.

(२) शनिवार, दिनांक २९ जुलै, २०२३ (शासकीय सुट्टी)

(३) रविवार, दिनांक ३० जुलै, २०२३ (शासकीय सुट्टी)

(४) सोमवार, दिनांक ३१ जुलै, २०२३ (सभागृहाची बैठक होणार नाही.)

(५) मंगळवार, दिनांक १ ऑगस्ट, २०२३ (मा.पंतप्रधान महोदयांचा पुणे दौरा असल्याने) सभागृहाची बैठक होणार नाही.

(६) बुधवार, दिनांक २ ऑगस्ट, २०२३, शासकीय कामकाज

(७) गुरुवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०२३ रोजी शासकीयक कामकाज, विरोधी पक्षाचा प्रस्ताव (अंतिम आठवडा प्रस्ताव)

(८) शुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट, २०२३ , शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज (ठराव)

Comments


bottom of page