top of page

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा


मुंबई, दि. १३ ऑगस्ट २०२४ (प्रतिनिधी/वार्ताहर) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार हा मान देण्यात आला आहे. डॉ. गोऱ्हे यांना आता वित्त विभागाने निर्धारित केलेल्या सर्व सेवा सुविधा अनुज्ञेय असतील, असे विधानमंडळ सचिवालयाने कळवले आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे या २००२ पासून विधानपरिषद सदस्य आहेत आणि सध्या त्यांच्या सदस्यत्वाची चौथी टर्म सुरू आहे. २०१९ पासून त्या विधानपरिषद उप सभापती म्हणून कार्यरत आहेत.

Comments


bottom of page