
1 march 2025
मुंबई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, या नियुक्त्या पक्षाच्या आगामी रणनीतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

विधानसभा काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या:
• अमीन पटेल – उपनेते
• अमित देशमुख – मुख्य प्रतोद
• विश्वजीत कदम – सचिव
• शिरीषकुमार नाईक – प्रतोद
• संजय मेश्राम – प्रतोद

विधानपरिषद काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या:
• सतेज ऊर्फ बंटी पाटील – गटनेता
• अभिजीत वंजारी – मुख्य प्रतोद
• राजेश राठोड – प्रतोद
काँग्रेसच्या या नव्या नेत्यांकडून विधिमंडळात प्रभावी भूमिका निभावण्याची अपेक्षा आहे. पक्षाच्या धोरणांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि सरकारच्या कामकाजावर आक्रमक पद्धतीने प्रश्न विचारण्यासाठी या नियुक्त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
(ताज्या अपडेट्ससाठी वाचत राहा Mim Times)