![](https://static.wixstatic.com/media/8c5a98_c78040fc3e16480d8363523259e0e6a1~mv2.jpg/v1/fill/w_400,h_225,al_c,q_80,enc_auto/8c5a98_c78040fc3e16480d8363523259e0e6a1~mv2.jpg)
10 February 2025
मुंबई,प्रयागराज संगम रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्यामुळे होणाऱ्या असुविधेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने स्थानक तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, या निर्णयानंतर सोशल मीडियावर स्थानक कायमचे बंद करण्याच्या अफवा पसरू लागल्या. या संदर्भात सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले की, "प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी."
महाकुंभ दरम्यान प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी रेल्वे विविध सुधारणा व व्यवस्थापन बदल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
See video