top of page

मराठा समाजासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय:छत्रपती संभाजी राजे गोवंडी येथे मराठा भवनाचे लोकार्पण

मुंबई, ता. 10 :  मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवलेला आवाज, मराठा आंदोलनाच्या वेळी घेतलेली भूमिका यांसह  अनेकदा ठाम भूमिका घेतलेल्या खासदार राहुल शेवाळे यांनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे, अशा शब्दांत छत्रपती संभाजी राजे यांनी खासदार शेवाळे यांच्या कार्याचा गौरव केला. शेवाळे यांच्या स्थानिक खासदार निधीतून गोवंडी येथे बांधण्यात आलेल्या मराठा भवनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. रविवारी दुपारी पार पडलेल्या या सोहळ्याला छत्रपती संभाजी राजे, खासदार राहुल शेवाळे यांसह आमदार प्रसाद लाड, माजी आमदार तुकाराम काते, युवराज संभाजी राजे छत्रपती

शिवसेना उपनेते लोकसभा गटनेते खासदार श्री राहुल शेवाळे साहेब आमदार श्री प्रसाद लाड माजी आमदार श्री तुकाराम काते मराठा समाजाचे नेते संभाजी राजे दहातोंडे, राजेंद्र कोंढरे बंसीदादा डोके,

महिला संपर्क प्रमुख सौ. कामिनी राहुल शेवाळे, शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, सुनीता वैती आणि मोठ्या संख्येने मराठा समाजतील बंधू - भगिनी उपस्थित होते.

गोवंडी येथील मराठा भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात सामील होण्याआधी छत्रपती संभाजी राजे, खासदार राहुल शेवाळे यांसह अन्य मान्यवरांनी पांजरापोळ येथील छत्रपती स्मारक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भव्य बाईक रॅलीतून सर्व मान्यवर कार्यक्रमस्थळी पोहोचले. छत्रपती संभाजी राजेंच्या शुभहस्ते मराठा भवनाचे लोकार्पण करण्यात आले.

Comments


bottom of page