top of page

मजासवाडी सर्वोदय नगर येथील सदनिकांचे रहिवाशांच्या कराराचा विषय महिन्याभरात निकाली काढणार

कोकणनगर येथील पोलिस स्टेशसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या प्लॉटवर पोलिस स्टेशन उभारणार

गेली अनेक १५ वर्षे रखडलेल्या जोगेश्‍वरी (पुर्व) पुनमनगर येथील पी.एम.जी.पी पुनर्वसन प्रकल्पातील अडथळे दूर करुन प्रकल्प महिन्याभरात मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांना बैठकीत दिले. त्याचबरोबर जानेवारी २०२० पासून येथील निवडणुक घेेण्यासाठी बंदी घातलेल्या संबंधित अधिकार्‍याने, बंदी उठविण्यासाठी कुठलाच निर्णय न घेतल्याने, याप्रश्‍नी, तात्काळ निर्णय घ्यावा, अशा सुचनाही त्यांनी संबंधित अधिकार्‍याला दिल्या.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात पी.एम.जी.पीच्या एकुण १७ इमारती असून यात सुमारे ९८२ सदनिकाधारक वास्तव्य करीत आहेत. या सर्व इमारती धोकादायक स्थितीत असल्याने या इमारतींमध्ये सद्यस्थिती जीव मुठीत धरुन राहणार्‍या रहिवाशांना दिलासा मिळावा यासाठी विधानसभक्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी विधानसभेतील विविध आयुधांच्या माध्यमातून या गंभीर प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री, सचिव, म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, यांच्या समवेत बैठकाही घेतल्या तसेच पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीटही करण्यात आले असून त्याचा अहवालही म्हाडाकडे पाठविण्यात आला आहे. या इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्याने त्या पाडण्यात याव्यात, असे अहवालात नमुद केले आहे. परंतु याप्रश्‍नी कुठलीच ठोस पावले म्हाडाकडून उचण्यात न आल्याने आमदार वायकर यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली होती. या बैठकीला माजी नगरसेवक बाळा नर, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख नंदु ताम्हणकर, एम.एम.आर.डीचे रहिवाशी, म्हाडाच्या संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

पी.एम.जी.पी पुनर्वसनाच्या रखडलेल्या कामाचे नेमके कारण कळल्यावर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल यांनी, या पुनर्वसन प्रकल्पातील अडथळे दूर करुन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्‍वासन आमदार वायकर यांना दिले. मजासवाडी सर्वोदयनगर येथील रिहॅबमधील १७१ रहिवाशांना लॅाटरीच्या माध्यमातून विकासकाने घरे दिली असतानाही अद्याप त्यांची करारपत्रे करण्यात आली नसल्याचीबाब आमदार वायकर यांनी उपाध्यक्ष यांच्या नजरेत आणताच येत्या महिन्याभरात या १७१ जणांची करारपत्रे करण्यात येतील, इंदिरानगर येथील म्हाडाच्या प्लॉटवरील रहिवाशांकडून काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या निकाल काढण्यात येतील, कोकणनगर येथील म्हाडाचा प्लॉट हा पोलिस स्टेशनसाठी राखीव आहे. तेथे पोलिस स्टेशन बांधण्यात येईल, म्हाडाचे आर.जी व पी.जीच्या प्लॉटची यादी तयार करुन

ते प्लॉट मनपाला हॅन्डओवर करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासनही उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जयस्वाल यांनी आमदार वायकर यांना दिले.

Comments


bottom of page