top of page

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याचे आवाहन

3 December 2024


मुंबई, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने सन २०२३-२०२४ करिता उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांसाठी नामांकने व शिफारशी मागविण्यात आल्या आहेत. पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. इच्छुक पत्रकारांनी आपली अर्ज प्रवेशिका २५ डिसेंबर २०२४ पूर्वी पाठवाव्यात, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

या पुरस्कारांतर्गत एकूण चार प्रकारांचे पुरस्कार दिले जाणार आहेत:

• कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार:

या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी पत्रकाराचे वय किमान ६० वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून, पत्रकारितेत किमान २५ वर्षांचे योगदान असावे. राज्यस्तरावर केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या आधारे आणि मान्यवरांच्या शिफारसींच्या आधारे निवड केली जाईल. याआधी श्री. वसंत देशपांडे, श्री. विनायक बेटावदकर, श्री. कुमार कैतकर यांसारख्या दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

• राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार:

या पुरस्कारांतर्गत दोन पुरस्कार दिले जातील – एक वृत्तपत्र प्रतिनिधी आणि दुसरा वृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधी यांना. अर्जासोबत मागील दोन वर्षांच्या बातम्यांची कात्रणे किंवा सीडी/पेनड्राईव्हमध्ये सामग्री जोडणे आवश्यक आहे.

• उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (संघ सदस्यांसाठी):

हा पुरस्कार फक्त मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी खुला आहे. अर्जदाराने १ जानेवारी २०२३ पासूनच्या बातम्या, कात्रणे किंवा चित्रफीत जोडून अर्ज करावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, तळमजला, पत्रकार कक्ष, मंत्रालय, मुंबई ४०००३२

ईमेल: mahamantralaya@gmail.com

सदर पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार असून, पत्रकारांनी तपशीलवार माहिती देऊन आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


bottom of page