top of page

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा १५१ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा


बृहन्मुंबई महानगरपालिकेचा १५१ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा १५१ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

मुंबई, ४ सप्टेंबर २०२४: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा १५१ वा वर्धापन दिन आज उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या मुख्यालयासह विविध विभागीय कार्यालये, रुग्णालये, आणि शाळांमध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध संतूर वादक पद्मश्री सतीश व्यास आणि लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. वैशाली सामंत यांनी त्यांच्या लोकप्रिय गाण्यांनी उपस्थितांचे मन जिंकले.

रुग्णालयांमध्येही वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात पॉक्सो कायद्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात ४६४ वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, आणि विद्यार्थी सहभागी झाले.

विभागीय कार्यालयांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मुंबईत ए विभागामार्फत स्वच्छता जनजागृती मोहीम राबवण्यात आली. डी विभागात कचरा वर्गीकरण आणि पर्यावरण संतुलनावर प्रबोधनात्मक फेरी काढण्यात आली. पश्चिम उपनगरांमध्ये स्वच्छता अभियान आणि कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

महानगरपालिकेच्या स्थापना दिनानिमित्ताने आयोजित विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Comentários


bottom of page