top of page

बीएमसीने कंत्राटाच्या रकमेपेक्षा अधिक दराने सीसी रस्त्याचे कंत्राट दिल्या

मुंबई: भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून बीएमसीने दक्षिण मुंबईसाठी सीसी रस्त्याचे कंत्राट अंदाजित रकमेपेक्षा अधिक दराने दिल्यास त्याविरोधात लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे. अधिक दराचे कंत्राट देवून कंत्राटदाराला अतिरिक्त बोनस देवू नये. नागरिक त्याला निवडणुकीच्यापूर्वीचा भ्रष्टाचार समजतील अशी भीती नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.बीएमसी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नार्वेकर म्हणाले की, महापालिकेने दक्षिण मुंबईतील सीसी रस्त्यांसाठी पुन्हा निविदा मागवल्या आहेत.  1,600 कोटी रुपयांच्या करारासाठी अंदाजापेक्षा 9 टक्के अधिक दराने M/s NCC Ltd सर्वात कमी दराचा ठेकेदार झाला आहे. मात्र ती रक्कम अंदाजित रकमेपेक्षा 150 कोटीनी अधिक आहे.माझ्या पत्रानंतर महापालिकेने दर कमी करण्यासाठी कंत्राटदाराशी वाटाघाटी सुरू केल्याचे समजते. मात्र त्या कंत्राटदाराने कंत्राटाच्या अंदाजित रकमेनुसर निविदा स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे समजते, असे नार्वेकर म्हणाले. 

नार्वेकर यांनी बीएमसीला दर आणखी कमी करण्यासाठी कंत्राटदाराशी पुन्हा वाटाघाटी सुरू करण्याची विनंती केली आणि कंत्राटदारास अंदाजानुसार करार स्वीकारण्यास तयार केले पाहिजे, असे म्हटले आहे.शहरभरातील इतर सर्व सीसी रस्त्यांचे कंत्राट अंदाजपत्रकाच्या रकमेत देण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईचे कंत्राटही अंदाजापेक्षा जास्त दराने देवू नये. तसे केल्यास नागरिकांना तो निवडणुकीपूर्वीचा भ्रष्टाचार वाटू शकतो, असे नार्वेकर म्हणाले.जर बीएमसीने अंदाजित दरापेक्षा जास्त दराने कंत्राट दिले, तर दक्षिण मुंबईतील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लोकायुक्तांकडे त्या निर्णयाविरोधात दाद मागणार असल्याचा इशारा नार्वेकर यांनी दिला. सीसी रस्ते न बनवल्यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांना दीड वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. महापालिकेने त्यांच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नये असे आवाहनही नार्वेकर यांनी केले.

Comments


bottom of page