top of page

बदलापुरातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार





बदलापुरात घडलेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेबाबत महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते, श्री. विजय वडेट्टीवार यांनी कडक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी फोनवरून बदलापूर पोलिस आयुक्त श्री. डुंबरे यांच्याशी चर्चा केली आणि या प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी केली.

वडेट्टीवार यांनी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता त्यांना अकरा तासांपेक्षा अधिक काळ पोलिस स्थानकात बसवून ठेवणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून यापुढे असे प्रकार घडू नयेत.

Yorumlar


bottom of page