top of page

पुण्यासाठी अनोखी पहल फत्तेचंद रांका, उमेश शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत एक्स्पोचा शुभारंभ

5 January 2025


पुणे: दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने आयोजित सैफी बुरहानी बिझनेस एक्स्पो २०२५ चे उद्घाटन शनिवार, ४ जानेवारी रोजी डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे मोठ्या दिमाखात पार पडले. हा कार्यक्रम दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धर्मगुरु परमपूज्य सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे चिरंजीव हुसैन बुरहानुद्दीन यांच्या हस्ते संपन्न झाला.


कार्यक्रमाला किर्लोस्कर न्यूमॅटिक्सचे चेअरमन राहुल किर्लोस्कर, आयकर आयुक्त डॉ. नितिन वाघमोडे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख उमेश शाह यांच्यासह समाजातील अनेक उद्योगपती व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उद्घाटन सोहळा आणि सन्मान


उद्घाटनापूर्वी दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने फत्तेचंद रांका व उमेश शाह यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी एक्स्पोमधील विविध स्टॉल्सला भेट दिली व त्यावरील उत्पादनांची व सेवांची माहिती घेतली.


देश-विदेशातील १७० स्टॉल्सचा सहभाग


६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या बिझनेस एक्स्पोमध्ये महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्ये व परदेशातील व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. या एक्स्पोमध्ये एमएसएमई, स्टार्टअप्स, महिला उद्योजक, रिटेलर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, हेल्थकेअर प्रोफेशनल्स यांसारख्या १७० हून अधिक स्टॉल्स आहेत.


नवीन संधी आणि पर्यावरण संवर्धन


पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी स्टॉल्सला भेट दिली व उत्पादने खरेदी केली. एक्स्पोच्या आयोजकांनी प्रत्येक भेट देणाऱ्याला एक झाड भेट देऊन हरित आणि प्रदूषणमुक्त पुणे या उद्दिष्टाला प्रोत्साहन दिले.


प्रमुख पाहुण्यांचे विचार


फत्तेचंद रांका म्हणाले, “दाऊदी बोहरा समाज उद्योग आणि व्यापारात अग्रगण्य आहे. या एक्स्पोच्या माध्यमातून समाजाची उद्यमशीलता अधिक दृढ झाली आहे.”


उमेश शाह यांनी सांगितले, “सैफी बुरहानी एक्स्पो हा दाऊदी बोहरा समाजाचा अभिनव उपक्रम आहे. या माध्यमातून पुण्यातील व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल.”


एक्स्पोला भेट देण्याचे आवाहन


हा एक्स्पो विविध व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण करणारा आहे. पुणेकरांनी या अनोख्या एक्स्पोला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Video

(मिम टाइम्ससाठी विशेष वृत्त)

bottom of page