top of page

पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचं लोकार्पण, खेड बायपास, मंचर बायपास व एकलहरे मार्गांचं चौपदरीकरण

पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचं लोकार्पण, खेड बायपास, मंचर बायपास व एकलहरे मार्गांचं चौपदरीकरण तसंच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डच्या लोकार्पणाचा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला माझ्यासह उपमुख्यमंत्री देवंद्रा फडणवीस व अन्य मान्यवर उपस्थित होते.चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे ही समस्या दूर करण्यात यश आलं. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनानंही चांगले प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पोलीस आणि नागरिकांचंही सहकार्य लाभलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनाज ते चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंतही मेट्रो कमीत कमी कालावधीत पोहोचवायची आहे.पुणे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांनी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्यानं पुणे शहराला त्याचा लाभ होणार आहे. पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्यानं रस्ते, मेट्रो, विमान वाहतूक अधिक सक्षम करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी नागरिकांचं सहकार्य आवश्यक आहे. पुणे अंतर्गत चक्राकार मार्गाची जबाबदारी केंद्र सरकारनं घ्यावी, राज्य शासन आणि पुणेकर यासाठी सर्व सहकार्य करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

Comments


bottom of page