top of page

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांशी संवाद


महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका विषयक वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करीत विविध विषयांवर सुसंवाद साधला.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात झालेल्या या भेटीप्रसंगी मा. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासमवेत माजी नगरसेवक परभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाठ, कमलेश यादव आणि विविध मान्यवर व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

वार्तालाप कार्यक्रमाच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिका वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री लोढा यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आजच्या वार्तालाप कार्यक्रमादरम्यान मुंबईतील विविध नागरी सेवा सुविधांबाबत पत्रकारांचे अनुभव जाणून घेतले. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात येत असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी याप्रसंगी पत्रकारांना दिली. त्याचबरोबर महानगरपालिकेत वार्तांकन करतानांचा पत्रकारांचा अनुभव देखील मंत्री महोदयांनी जाणून घेतला.

वार्तालाप कार्यक्रमानंतर लोढा यांनी महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात पत्रकारांना देण्यात येत असलेल्या विविध सोयी सुविधांची देखील माहिती घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पत्रकारांना देण्यात येत असलेल्या या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

Comentários


bottom of page