top of page

पवार यांच्या विरोधात दिलीप वळसे नी केलेल्या वक्तव्याविरोधा मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात राज्यातील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आवमान कारक केलेल्या वक्तव्याच्या निषेधारत मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज प्रदेश कार्यालयासमोर दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन मुंबई शहर अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना आता शरद पवार साहेबांवर निष्ठा आणि प्रेम करणारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निलेश भोसले यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मात्र टीका करणाऱ्या व्यक्तीने आजपर्यंत पुण्याचा पालकमंत्री पद देखील भूषवलं नाही. ज्या व्यक्तीची पुण्याचे पालकमंत्री होण्याची पात्रता देखील नाही अशा व्यक्तीने पवार साहेबांच्या विरोधात बोलणे असोबनीय आहे. जर शरद पवार साहेबांन विरोधात असंच बोलत असणार तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्हाला फिरू देणार नाही.

मी कुठेही आदरणीय शरद पवारसाहेबांवर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही - दिलीप वळसे पाटील

पवारसाहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही;जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी.

माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवारसाहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही असा खुलासा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत केला आहे. एवढा मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे होते. ते घडले नाही त्याबद्दलची खंत काल दिलीप वळसे पाटील यांनी बोलून दाखवली. ही खंत केवळ कालच (रविवार) बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. आदरणीय पवारसाहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मुंबई शहर अध्यक्ष ॲड. निलेश भोसले यांनी केले. यावेळी मुंबई कार्याध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन नारकर, मेहुल जाधव, ट्विनकल परमार, काशिफ शाह, नजीर शेख, गणेश स्वामी, रवि अहिरे, अशफक भाई, अरमान खान, संतोष पवार, गौतम खंडागळे, राजू थोरात यांची उपस्थिती होती.

Comments


bottom of page