top of page

धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना



 September 30, 2024

Dharavi, Mumbai, धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी एक महत्त्वाची योजना राबवण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या परवडणाऱ्या भाडेतत्त्वावरील घरे योजनेला मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून झोपडपट्टीचा सर्व्हे तातडीने पूर्ण करावा लागेल, ज्यामध्ये पात्र आणि अपात्र झोपडपट्टी धारकांची संख्या निश्चित केली जाईल. त्यानुसार, त्यांच्यासाठी किती जमीन लागेल हे देखील ठरवले जाईल. यामध्ये क्रेडीट लींक सबसिडी अंतर्गत राज्य शासनावर कोणतेही आर्थिक दायित्व येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. या दायित्वाची जबाबदारी विशेष हेतू कंपनीची असेल. हे धोरण इतर कोणत्याही प्रकल्पावर लागू होणार नाही.

या योजनेच्या माध्यमातून धारावीतल्या झोपडी धारकांना चांगली आणि परवडणारी निवासव्यवस्था उपलब्ध होईल, याची अपेक्षा आहे.


Comments


bottom of page