top of page

धारावी प्रकल्पातील भूमिपूजनाचा कार्यक्रम धारावी बचाव आंदोलनाच्या तीव्र विरोधामुळे रद्द

धारावी
धारावी

मुंबई,धारावी पुनर्विकास प्रकल्पातील भूमिपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम धारावी बचाव आंदोलनाच्या तीव्र विरोधामुळे रद्द करण्यात आला आहे. हा कार्यक्रम DRPPL ने गुरुवारी, १२ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केला होता. मात्र, धारावी बचाव आंदोलनाने न्याय्य मागण्या मान्य न झाल्यामुळे आंदोलनाचा इशारा दिला, ज्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनविषयी आणि धारावीतील रहिवाशांच्या हक्कांविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामध्ये पात्रतेची अट रद्द करून घरांच्या बदल्यात घर, आणि दुकानदारांना दुकान याच ठिकाणी मिळण्याची मागणी केली जात आहे. धारावीतील रहिवाशांना अपात्र ठरवून त्यांना बाहेर काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

या विरोधात आज बुधवार, ११ सप्टेंबर २०२४ रोजी माटुंगा येथे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलनाची दखल घेत DRPPL ने भूमिपूजनाचा कार्यक्रम तातडीने रद्द केला. आंदोलनकर्त्यांनी असा इशारा दिला आहे की, भविष्यात हा कार्यक्रम पुन्हा आयोजित केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.

Comments


bottom of page