top of page

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे लोकार्पण


**मुंबईतील प्रवासात मोठा बदल: नवीन किनारी रस्ता प्रकल्पामुळे प्रवास जलद आणि आरामदायक होईल**
**मुंबईतील प्रवासात मोठा बदल: नवीन किनारी रस्ता प्रकल्पामुळे प्रवास जलद आणि आरामदायक होईल**

मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबईसाठी मोठा बदल घडविणारा धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू झाला. या प्रकल्पामुळे मुंबईतील प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायक होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या नवीन प्रकल्पामुळे, मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक हा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे मुंबईकरांना वेळेची आणि इंधनाची बचत होईल आणि प्रदूषण कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

लोकार्पण समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात वर्सोवा, भायंदर आणि विरारपर्यंतचा विस्तार होईल. भविष्यात, मुंबई ते वर्सोवा या अंतराचा प्रवास फक्त 40 ते 50 मिनिटांत पार होईल. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

प्रकल्पाचे ठळक मुद्दे:

  • हा प्रकल्प मरीन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत बांधला जात आहे.

  • वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारा 827 मीटर लांबीचा पुल तात्पुरत्या स्वरुपात सुरू आहे.

  • पुढील टप्प्यात, वरळी ते मरीन ड्राईव्ह 9.29 किमी, मरीन ड्राईव्ह ते लोटस जंक्शन 6.25 किमी आणि हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग 3.5 किमी यावर काम चालू आहे.

या प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

  • भारतातील सर्वात मोठ्या व्यासाच्या बोगद्याची निर्मिती.

  • भारतात प्रथमच एकलस्तंभ पद्धतीने पुलाची बांधणी.

  • समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम.

या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Comentarios


bottom of page