top of page

दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांची राज्यपालांसोबत राजभवनात बैठक


माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळासह महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दिव्यांग बांधवांसाठी कार्य करणाऱ्या मानव विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शेवाळे यांनी दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांकडे माननीय राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यपालांनी या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी शेवाळे यांनी दिव्यांग बांधवांसाठी अधिक चांगल्या सुविधांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

コメント


bottom of page