
29 December 2024
नवी दिल्ली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील 11 उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय महासचिव व प्रमुख प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या मंजुरीनंतर या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली.
घोषित उमेदवारांची नावे व विधानसभा क्षेत्र:
• बुरारी (2) - श्री. रतन त्यागी
• बादली (5) - श्री. मुलायम सिंग
• मंगोलपुरी (12) - श्री. खेमा चंद
• चांदनी चौक (20) - श्री. खालिद उर रेहमान
• बळी मरान (22) - श्री. मोहम्मद हारून
• छतरपूर (46) - श्री. नरेंद्र तंवर
• संगम विहार (49) - श्री. कमर अहमद
• ओखला (54) - श्री. इमरान सैफी
• लक्ष्मी नगर (58) - श्री. नमाह
• सीमापुरी (63) - श्री. राजेश लोहीया
• गोकळपुरी (68) - श्री. जगदीश भगत
ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले की, "पहिल्या टप्प्यात निवडलेल्या या उमेदवारांनी पक्षाच्या मूल्यांना प्राधान्य दिले असून दिल्लीच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत."
या घोषणेसोबतच पक्षाने दिल्लीतील आगामी निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
• ही माहिती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. प्रफुल पटेल, व इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आली आहे.