11, December 2024
मुंबई,दादर पारशी कॉलनीतील नागरिकांनी मा. नगरसेवक अमेय अरुण घोले यांचा सोबत आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांची भेट घेतली. या बैठकीत कॉलनीत सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली तसेच नागरिकांच्या समस्या व सूचना मांडण्यात आल्या.
बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली:
1️⃣ ठरलेल्या वेळापत्रकाचे पालन: रस्ते बांधकामासाठी वेळापत्रक निश्चित करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणी, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.
2️⃣ सुरक्षित मार्गाची व्यवस्था: उत्खनन सुरू असताना वृद्ध नागरिक आणि लहान मुलांसाठी सुरक्षित व सोयीचा मार्ग उपलब्ध करून देण्याची सूचना.
3️⃣ ब्रूमिंग तंत्राचा वापर: स्टॅम्प कॉंक्रिटच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे ब्रूमिंग तंत्राचा वापर करावा, कारण ते अधिक टिकाऊ व परिसरासाठी योग्य ठरू शकते.
नागरिकांनी बीएमसीकडून या सूचना अंमलात आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. बैठक सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचे नागरिकांनी नमूद केले.