top of page

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे अल्पशः आजाराने आज निधन झाले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव विशेष लोकप्रिय होते. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले होते. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला.

आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला असे अनेक चित्रपट त्यांचे विशेष गाजले. दिवंगत सीमा देव यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, भावपूर्ण श्रद्धांजली

Commenti


bottom of page