top of page

जीवन प्रबोधिनी ट्रस्ट आणि आधारिका फाउंडेशन मार्फत निर्भया महिला दहीहंडी पथकाची घोषणा


जीवन प्रबोधिनी ट्रस्ट आणि आधारिका फाउंडेशनच्या माध्यमातून निर्भया महिला दहीहंडी पथकाची घोषणा,आधारिका फाउंडेशनने जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या सहकार्याने दहीहंडीच्या शुभ दिवशी स्वसंरक्षण तंत्राचे प्रात्यक्षिक करून महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई तसेच सर्व सहभागी मुली (80) मार्शल आर्टचे उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या (वयोगट 8 वर्षे - 19 वर्षे) काली मातेची वेशभूषा करून मर्दानी चित्रपटातील गाण्यावर मार्शल आर्ट्स सादर करतील आणि धरमवीर चित्रपटातील आई जगदंबे या गाण्यावर नृत्य करतील.तसेच समाजातील महिलांच्या सन्मानावर ध्वनिमुद्रित केलेले भाषणही सादर केले जाणार आहे. तसेच दहीहंडीत त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी मुली 4-5 थरांचा एक पिरॅमिड तयार करतील, या कार्यक्रम मुळे समाजात खरोखर बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.

Comments


bottom of page