
मुंबई, दि. 13 : जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी एक आदर्श कार्यप्रणाली लवकरच लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी प्रकरणास स्थगिती मिळाल्याप्रकरणी ॲड. सरिता सैंदाणे यांनी दिलेल्या निवेदनावर मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, जन्म नोंदणी अनिवार्य आहे आणि या संदर्भात गृह विभाग कार्यवाही करत आहे. लवकरच एक आदर्श कार्यप्रणाली तयार होईल, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुसंगत आणि पारदर्शक होईल.
या कार्यप्रणालीचे कार्यान्वयन केल्यानंतर, नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही, असे महसूल मंत्र्यांनी यावेळी सांगितले.