top of page

गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विदर्भात काँग्रेसचा विजयाचा दावा


गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल काँग्रेसमध्ये सामील; विदर्भात काँग्रेसचा विजय निश्चित, भाजपाचे आरोप 'उलटा चोर कोतवाल को डांटे'
गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल काँग्रेसमध्ये सामील; विदर्भात काँग्रेसचा विजय निश्चित, भाजपाचे आरोप 'उलटा चोर कोतवाल को डांटे'

मुंबई, १३ सप्टेंबर २०२४ - गोंदियाचे माजी भाजपा नेते गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या प्रवेशामुळे विदर्भातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रमेश चेन्नीथला यांनी राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांची टीका केली. "राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेद्वारे देश जोडण्याचे महत्त्वाचे काम केले आहे, आणि आता देशाचे विभाजन करु पाहणाऱ्या शक्तींना उत्तर देण्याची वेळ आली आहे," असे ते म्हणाले.

नाना पटोले यांनी राहुल गांधींवर भाजपाने लावलेल्या आरक्षणविरोधी आरोपांचा समाचार घेतला. "राहुल गांधींनी आरक्षणासाठी नेहमीच समर्थन केले आहे. भाजपाचे हे आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशी स्थिती आहे," असे पटोले म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारची खुर्ची डळमळीत असल्याचे सांगत, "लवकरच वाजपेयी सरकारच्या १३ महिन्यांच्या कार्यकाळाची पुनरावृत्ती होईल," असा विश्वास व्यक्त केला.

विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमात विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments


bottom of page